शासकीय निधीचा अपहार प्रकरणी देवळेच्या माजी सरपंचास अटक 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 3 मे 2018

जुन्नर - आदिवासी भागातील देवळे ता.जुन्नर ग्रामपंचायतीत शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी तत्कालीन सरपंच छगन गेणू घुटेला अटक केली. याबाबत पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी माहिती दिली.

ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक आणि अन्य दोघांनी मिळून सुमारे ४ लाख ९३ हजार रुपयाच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे आढळून आले आहे. विस्तार अधिकारी चंद्रकांत वसईकर यांनी चौघांच्या विरोधात जुन्नर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर या चार जणांपैकी घुटेला अटक करण्यात आली असून अन्य आरोपी पळून गेले असल्याचे घोडके यांनी सांगितले.

पंचायत समिती जुन्नरचे विस्तार अधिकारी चंद्रकांत वसईकर विस्तार यांनी नोव्हेंबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत देवळे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शासकीय निधीच्या अपहार बाबतची फिर्याद जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मंगेश कृष्णा ठोगिरे (ग्रामसेवक) व या गावाचे सरपंच छगन गेणू घुटे यांनी सरपंच पदाची मुदत संपल्यानंतर आपाआपसात संगनमत करून तसेच ग्रामसेवकास निलंबित केल्यानंतर देखील संयुक्त सहीने ४ लाख ९३ हजार एव्हढी रक्कम बँकेमधून काढून त्याचा अपहार केला. यामधील काही रक्कम तुषार कोरडे व राहुल लांडे यांच्या खात्यावर त्यांनी जमा केली असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२०, १८८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Former Sarpanchas are arrested in the case of government funding