ज्या सोसायटीत सुरक्षा द्यायचा त्या ठिकाणीच केली चोरी; सोनारासह तिघांना अटक

Former security guard steals 25 tola gold jewellery from Society in lohgav pune.jpg
Former security guard steals 25 tola gold jewellery from Society in lohgav pune.jpg

विश्रांतवाडी(पुणे) : लोहगाव येथील एका उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमधील 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. याच सोसायटीत पूर्वी  'तो' सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपींमध्ये एका सोनाराचा देखील समावेश आहे.

याप्रकरणी संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव (वय 35 रा. पोरवाल रोड लोहगाव) याच्यासह त्याचा साथीदार संतोष उर्फ रॉकी  अरुण धनवजीर (वय 34 रा. निंबाळकरनगर लोहगाव) यांच्यासह चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार अशोक गणेशलाल जाणी (वय 54 रा. शनिवार पेठ, सातारा) या तीन आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. 
 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

लोहगाव डी.पी. रोड येथील न्याती एव्हीटा उच्चभ्रू या सोसायटीत राहणारे  सौरभ कुंदन हे 30 डिसेंबर रोजी वडिलांना भेटण्यासाठी कात्रज येथे कुटुंबियांसमवेत गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटमधील लॉक तोडून कपाटातून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.विमानतळ पोलीस ठाणे तपासपथकातील तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातम्या आधारावरून आरोपींचा शोध घेत असताना याच सोसायटीत पूर्वी सुरक्षारक्षकांना काम करणाऱ्या संतोष उर्फ लारा जाधव यानेच घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून त्याला ताब्यात घेऊन अधिक तपासात त्यानेच संतोष उर्फ रॉकी धनवजीर याच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी  केलेले दागिने त्यांनी सातारा येथील सोनार अशोक जानी यांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 

अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​

पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हा निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश भेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, अरुण पठाण, राहुल मोरे, किरण अबदागिरे, वैभव खैरे, प्रशांत कापुरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा शोध लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com