श्री बेल्हेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

अर्जुन शिंदे
शनिवार, 5 मे 2018

बेल्हे येथे श्री बेल्हेश्वर विद्यालयात सन १९९७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यानिमित्त, गेल्या रविवारी (ता.२९) सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या.

आळेफाटा : बेल्हे (ता. जुन्नर) येथे श्री बेल्हेश्वर विद्यालयात नुकतेच (ता.२९) सन १९९७ च्या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सुमारे वीस वर्षांनंतर जवळपास 70 माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

बेल्हे येथे श्री बेल्हेश्वर विद्यालयात सन १९९७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यानिमित्त, गेल्या रविवारी (ता.२९) सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक रमेश झावरे होते. याप्रसंगी गणेश गोसावी, प्रदीप पिंगट, नारायण पवार, विनोद गायकवाड, मिलन गुंजाळ, सुजाता गाडगे, सुरेखा नवले, हर्षदा खंदारे, सुनीता कुंजीर, वंदना काणे आदी माजी विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी विद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी योग्य ते सहकार्य करण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आला. 

माजी विद्यार्थ्यांनी दहावी नंतरच्या वीस वर्षांच्या जीवन प्रवासातील अनुभव व बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सेवानिवृत्त पर्यवेक्षक रमेश झावरे, हरिभाऊ आहेर, रोहिदास बेलकर, बी. एल. पिंगट, एस. एस. जाधव, विकास गोसावी, श्रीमती बी. एन. बनकर  आदी गुरुजनांचा ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच माजी विद्यार्थी प्रदीप गाडेकर यांचाही पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबद्दल सपत्नीक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गोसावी यांनी, सूत्रसंचालन प्रदीप पिंगट यांनी, तर आभारप्रदर्शन सुभाष गुंजाळ यांनी केले.

Web Title: Former students get together Shri belhekar School