नऊ किल्ले एकाच दिवशी सर

जुन्नर - तालुक्‍यातील किल्ले सर करणारे संतोष डुकरे व शरद बोदगे.
जुन्नर - तालुक्‍यातील किल्ले सर करणारे संतोष डुकरे व शरद बोदगे.

पिंपळवंडी - ट्रेकिंगसाठी उत्तम समजले जाणारे हडसर, निमगिरी, हनुमंतगड, जीवधन, चावंड, शिवनेरी, सिंदोळा, नारायणगड हे आठ दुर्गम गिरिदुर्ग व जुन्नरचा भुईकोट असे तालुक्‍यातील नऊ किल्ले एकाच दिवशी सर करण्याची कामगिरी किल्लेदारी समूहाच्या संतोष डुकरे (पारगाव तर्फे आळे) व शरद बोदगे (नारायणगाव) या तरुणांनी केली. त्यांना संजय झिंजाड, नीलेश खोकराळे, सागर चव्हाण, अनिल तट्टू, नितीन ढमढेरे, नीलेश शेजवळ, सुभाष कुचिक, भाऊ कुचिक, सीताराम धादवड, तुषार वाळुंज, संदीप घेगडे, मयूर मांडे व इतर ट्रेकर्सनी विविध किल्ल्यांवर साथ दिली. 

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्‍यात दहा किल्ले आहेत. यातील दुर्ग ढाकोबा वगळता उर्वरित सर्व किल्ले संतोष व शरद यांनी शनिवारी सलग सोळा तासांत सर केले. यादरम्यान त्यांना तब्बल २१० किलोमीटरचा प्रवासही करावा लागला. पहाटे ५.३६ वाजता राजूर क्रमांक १ पासून हडसर किल्ल्याने मोहिमेचा प्रारंभ झाला. हडसर (१.३० तास), निमगिरी व हनुमंतगड (१.३० तास), जीवधन (२ तास), चावंड (१ तास), शिवनेरी (१.१५ तास), जुन्नर भुईकोट (१५ मिनिटे), सिंदोळा (२.३० तास) मार्गे खोडद येथील नारायणगड किल्ल्यावर (१ तास) रात्री ९.३० वाजता मोहिमेचा समारोप झाला. या प्रसंगी खोडद ग्रामस्थांमार्फत दोन्ही ट्रेकर्सचा सन्मान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com