हवालदारानं दाखवला कायद्याचा बडगा; फॉर्च्युनरवाल्याला‌ शिकवला 24 हजारांचा धडा!

Fortunes driver broke the rules 24 times and he was fined 24 thousand in pune
Fortunes driver broke the rules 24 times and he was fined 24 thousand in pune

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंडाच्या रकमेची पावती मोबाईलवर येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना आता चाप बसणार आहे. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्‍कम न भरणाऱ्या चालकांसाठी 'पीटीपी' नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्यात अशाच एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाकडून लष्कर वाहतूक पोलिसांनी चक्‍क 24 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला.

शहर वाहतूक शाखेकडून पुणे ट्रॅफिक पोलिस (पीटीपी) नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत चौकांमध्ये नाकाबंदी करून ई-चलन मशिनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्‍कम तपासली जात आहे. एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्‍कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे. लष्कर वाहतूक विभागातील पोलिस हवालदार मार्तंड जगताप यांनी गुरुवारी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीच्या चालकाने यापूर्वी पुणे-मुंबई एक्‍सप्रेस-वेवर तब्बल 24 वेळा स्पीड लिमिटचे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यापोटी प्रत्येक वेळी एक-एक हजार रुपये असा 24 हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. परंतु ती रक्‍कम भरली नव्हती. सध्या वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून नजर ठेवण्यात येत आहे.  

पोलिस आयुक्‍तांकडून ट्‌विटद्वारे अभिनंदन :
या कारवाईबद्दल पोलिस हवालदार मार्तंड जगताप आणि पुणे वाहतूक पोलिसांचे अभिनंदन. तसेच, एप्रिल महिन्यात अपघाती मृत्यूचे प्रमाण 55 टक्‍क्‍यांनी घटले आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत चांगले आहे. सर्वजण वाहतुकीच्या नियमाचे पालन करून अपघाताचे प्रमाण कमी करूयात, असे आवाहन पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम यांनी ट्‌विटरद्वारे केले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com