पुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह

सचिन बडे
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले. रेल्वे व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून टाकीतील पाण्याची तपासणी करताना हा प्रकार घडकीस आला. मृताची कोणतीही ओळख पटलेली नसून त्याचे वय साधारणपणे ५०च्या आसपास असल्याचे पोलिसांकडून सांगितले. 

घटनेची माहिती रेल्वे पोलिस स्थानकाला दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या मार्फत मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदणासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृताची ओळख पटू शकलेली नाही. संपूर्ण रेल्वे स्थानकाला या पाण्याच्या टाकीमधून पिण्याचे पाणी पुरविले जात असून ही पाण्याची टाकी खराब अवस्थेत आहे. टाकीच्या खोलीच्या दरवाजाला कुलूप लावलेले नसल्याने ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: found dead bodie in water tank supplying to Pune station