साडेचार लाख कुटुंबांना महापालिकेचे विमा कवच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - महापालिकेचा मिळकतकर तुम्ही मुदतीत भरला असेल, तर वर्षभर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आता महापालिका घेणार आहे. मुदतीत कर भरलेल्या करदात्यांच्या कुटुंबांना महापालिकेकडून पाच लाखांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरातील सुमारे साडेचार लाख कुटुंबांना महापालिकेकडून हे विम्याचे कवच मिळाले आहे. 

महापालिकेच्या मिळकत विभागाकडून मुदतीत कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत सवलत दिली जाते. गेली अनेक वर्षे ही सवलत देण्यात येत आहे. तर, मुदतीत कर न भरणाऱ्या करदात्यांवर दरमहा दोन टक्के दंडदेखील आकारला जातो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या योजनेला पुणेकर करदाते चांगला प्रतिसाद देत आहेत. या वर्षी मात्र महापालिकेने एक पाऊल आणखी पुढे टाकत करात सवलत देण्याबरोबरच मुदतीत कर भरणाऱ्या करदात्यांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याची योजना लागू केली आहे. तसेच, अपघातामध्ये अपंगत्व आल्यास देखील भरपाई मिळणार आहे. 

मिळकतकर भरण्याची 31 मे ही शेवटची तारीख आहे. त्यास तीन दिवसांचा कालावधी आहे. ज्या मिळकतदारांनी कर भरलेला नाही, त्यांनी मुदतीत कर भरून अपघाती विम्याचे संरक्षण घ्यावे, असे आवाहन उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी केले. 

शहरातील मिळकतींची संख्या 
7 लाख 73 हजार 
- आतापर्यंत कर भरलेल्या मिळकतदारांची संख्या 4.50 लाखांहून अधिक 
- एकूण जमा कर 536 कोटी रुपये 

Web Title: Four and a half million families in municipal insurance cover