पोलिसांना मारहाणप्रकरणी चौघांना अटक 

पोलिसांना मारहाणप्रकरणी चौघांना अटक 

पुणे : वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसह फरासखाना पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाणीचे तीन प्रकार घडले. एका घटनेमध्ये वाहतूक पोलिसाच्या डोक्‍यामध्ये लोखंडी स्टॅंड मारण्यात आला. दत्तवाडी, सातारा रस्ता, गणेश पेठ या तीन ठिकाणी या घटना घडल्या. या प्रकरणातील चार जणांना अटक करण्यात आली. 

पोलिस कर्मचारी सचिन येनपुरे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अजित आत्माराम लोखंडे (वय 33, रा. कसबा पेठ), कुमार गजानन पटेकर (वय 44, रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. येनपुरे हे फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षातून आलेल्या आदेशानुसार येनपुरे आपल्या सहकाऱ्यासमवेत गणेश पेठेतील परदेशी वाड्यामध्ये गेले. त्या वेळी भांडणे करणाऱ्या लोखंडे, पटेकर यांना पोलिस चौकीत येण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी येनपुरे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. 

दत्तवाडी पोलिस विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सुबराव लाड यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नीलेश मधुकर वैद्य (वय 21, रा. लगड मळा, वडगाव खुर्द) यास अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजता दत्तवाडी वाहतूक विभागात वाहतूक नियमन करत होते, त्या वेळी वैद्य याने त्याच्या दुचाकीवरील कारवाईचा राग मनात धरून फिर्यादींशी वाद घातला. 

सहकारनगर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. कोलते यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हेमंत कुबडे (वय 25, रा. जय भवानीनगर, जनता वसाहत) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कोलते हे बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता पुणे-सातारा रस्त्यावरील शारदा आर्केड येथे वाहतूक नियमन करत होते. त्या वेळी कुबडे हे त्यांच्या पत्नीस मारहाण करत होते. त्यांची भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोलते यांच्यावर डोक्‍यावर कुबडे याने त्यांच्याकडील लोखंडी स्टॅंड मारले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com