वाळूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी चारजण अटकेत

Sand Mafia
Sand Mafia

लोणी काळभोर : वाळूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी चार ट्रक चालकांना पोलिसांनी अटक केली असून, ट्रकमधील चौदा ब्रास वाळूसह चार ट्रक असा सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा एैवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्यावर शनिवारी (ता. 3) मध्यरात्री केलेल्या नाकाबंदी दरम्यान बेकायदा वाळुची वाहतूक करणारे चार ट्रक पोलिसांना आढळून आले आहेत.

याप्रकरणी ट्रक चालक रमेश शामराव फासगे (रा. रावणगाव ता दौंड), किशोर तुळशीदास गांधले, वासुदेव भानुदास शिंदे (रा. दोघेही शिरापूर ता. दौंड) व गोविंद रामराम माने (रा. आंबेगाव ता हवेली) या चौघांना अटक केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी महेश वसंत गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्यावर शनिवारी (ता. 3) मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पथकातील पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, श्रीकांत माळी, दत्ता तांबे, रवि शिनगारे, ज्ञानदेव क्षिरसागर, नितीन भोर, बाळासो खडके, समाधान नाईकनवरे यांचे पथकाने यांनी नाकेबंदी केली. यात वरील चार ट्रैक  सापडले.

वरील चारही ट्रक ताब्यात घेऊन, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी सदरची वाळू कोठून चोरली? याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सूरज बंडगर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com