व्यवस्थापकाला खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक 

व्यवस्थापकाला खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक 

पुणे - मॉलमधील कामावरून कमी केल्यानंतर कर्मचाऱ्याने अन्य साथीदारांसमवेत मॉलच्या व्यवस्थापकाला धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने चौघांना अटक केली. 

आशिष योहान साळवी (वय 29, रा. दापोडी), अमर शिवाजी अडसुळे (वय 30, रा. फुगेवाडी), एवीन राजन जेम्स (वय 27, रा. पिंपळे गुरव) व सुमीत ब्रह्मानंद गरुड (वय 24, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साळवी हा औंध येथील रिलायन्स फ्रेश या मॉलमध्ये नोकरीस होता. मॉलमधून तो तांदूळ, साबण, तेल अशा वस्तू चोरून नेत असल्याने मॉलच्या व्यवस्थापकाने त्यास कामावरून कमी केले होते. दरम्यान, साळवीने त्याचे साथीदार अमर, एवीन व सुमीत यांना बरोबर नेऊन 17 मार्चला रात्री मॉलचा व्यवस्थापक व सुरक्षारक्षकांना धमकी देऊन त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घेण्यास सांगितली होती. तसेच, व्यवस्थापकाकडे पैशांची मागणी केली होती. 

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलिस कर्मचारी राजू मचे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी गणेश काळे, मचे, शंकर पाटील व दत्तात्रेय फुलसुंदर यांच्या पथकाने त्यास अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com