कोंढवा येथे पार्किंगमधील आगीत चार दुचाकी जळाल्या

म्हस्कू खवले
शनिवार, 30 जून 2018

कोंढवा (पुणे): पार्किंगमधील विद्यूत मीटर बॅाक्सला शुक्रवारी (ता. 29) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने आगीत चार दुचाकी जळाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. आगीचे कारण समजू शकले नाही.

कोंढवा खुर्द भाग्योदय नगर येथील शिवनेरी नगर गल्ली नंबर 7 मधील सनुभर अपार्टमेंन्टच्या पार्कींग मध्ये विद्यूत मीटर बॅाक्सला रात्री आग लागली. येथील पार्कींगमध्ये दुचाकी उभ्या केल्या होत्या. त्यामधील चार दुचाकी आगीत जळू लागल्याने तेथील नागरिकांनी कोंढवा खुर्द येथील अग्निशामक दलाशी संपर्क केला. काही वेळातच अग्निशामक दालाचे अधिकारी अनिल गायकवाड, मोहन सणस, निलेश लोणकर, मनोज गायकवाड, उत्कर्ष टिळेकर, विकास ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.

Web Title: four bike fire in kondhwa pune