पुणे शहरातील चार कोविड सेंटर बंद

coronavirus
coronavirus

पुणे - कोरोनाच्या भीतीने कोट्यवधी रुपयांची खरेदी करीत उभारलेले कोविड केअर सेंटरला तात्पुरते टाळे लावण्याची भूमिका महापालिकेने बुधवारी पुन्हा घेतली आणि तब्बल दोन हजार रुग्णांच्या सोयीचे चार सेंटर बंद केले. या सेंटरमधील रुग्ण अन्य ठिकाणी हालविण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे या पुढे विविध भागांत केवळ सात सेंटर सुरू राहतील. पुरेसे रुग्ण नसल्यानेच ते बंद केल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्‍यतेने बहुतांशी भागांत कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्याठिकाणी रुग्ण, डॉक्‍टरांसाठी पुरेशा प्रमाणात सुविधा आहेत. मात्र, सध्या सेंटरच्या क्षमतेच्या तुलनेत रुग्ण कमी आहेत; तरीही देखभालीची कामे अधिक करावी लागत असल्याने काही सेंटर बंद केल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले. गरीब रुग्णांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या भागांत २० कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. तिथे साडेदहा हजार रुग्णांची व्यवस्था होती. याआधी ९ सेंटर बंद झाले होते. त्यानंतर उर्वरित ११ पैकी ४ सेंटरही आता बंद केले आहेत. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

साहित्याचा अन्यत्र वापर करणार
कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात खाटा, गादीसह फर्निचरची खरेदी करण्यात आली आहे. या साहित्याचा खर्चाचा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्याचा अन्य सेंटरमध्ये उपयोग करता येऊ शकतो, असे महापालिका सांगत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बंद होणारे सेंटर 
मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेज, कर्वेनगर,  निकमार, बालेवाडी
ट्रिनिटी, कोंढवा, बनकर शाळा, हडपसर   

महापालिकेच्या आणि खासगी मिळकतींमध्ये सुरू केलेले परंतु, आता ज्यांचा पुरेशा क्षमतेने वापर होत नाही; परंतु, त्यांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने ते बंद करीत आहोत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास साथ रोग नियंत्रण कायद्यातर्गंत या जागा ताब्यात घेऊन पुन्हा सुविधा सुरू करता येणार आहे.
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com