सांडपाणी वाहिन्यांच्या सल्ल्यासाठी चार कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी सल्लागार कंपनीला 3 कोटी 93 लाख रुपये देण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. येत्या मंगळवारी (ता. 12) स्थायीच्या बैठकीत यावर निर्णय होईल. 

हद्दीलगतची लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे नव्याने महापालिकेत घेण्यात आली आहेत. या गावांमधील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यात, रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. गावांमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याच्या आराखड्यासाठी खासगी सल्लागाराची नेमणूक करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या पार्श्‍वभूमीवर या कामाचा अहवाल करून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांत प्राथमिक कामे केली जाणार आहेत. दरम्यान, येथील वाहिन्या महापालिकेच्या हद्दीतील भागांना जोडण्यात येणार आहेत. या योजनेमुळे नव्या गावांतील सांडपाण्याची समस्या सुटणार आहे. भविष्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

Web Title: Four crores for the advice of sewage channels