पुण्यातील चौघांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावर खेड शिवापूर (ता. हवेली) येथे हॉटेल सागरसमोर रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळून पुण्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. 

अश्‍विनी वसंत असवले (वय ५२, रा. स्वारगेट, पुणे), उज्ज्वला रवींद्र सणस (वय ६०, रा. चंदननगर, खराडी, पुणे), अरुणा शिपिजल भोसले (वय ५४, रा. कात्रज बायपास, पुणे) आणि ओंकार पोळ (रा. शिंदेवाडी, ता. भोर) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

मोटारीतील चौघे सोमवारी पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. खेड शिवापूर येथील हॉटेल सागरसमोरील रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर मोटार पाठीमागून आदळली. या अपघातात गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ओंकार हा गाडी चालवत होता. या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. गाडीत अडकलेले दोन मृतदेह स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी सुमारे अर्ध्या तासाने बाहेर काढले. 

पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष 
पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल सागरसमोरील रस्त्यावर सर्रास ट्रक उभे असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असल्याचे स्थानिक पत्रकारांनी वारंवार निदर्शनास आणूनही पोलिस त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत होते. सोमवारी याच ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकने अखेर चौघांचा बळी घेतला. त्यामुळे या अपघातप्रकरणी हॉटेलमालक आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Web Title: four dead in accident near khed shivapur