पीएमआरडीएकडून चार अग्निशामक केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे : वाघोली, नांदेड सिटी (ता. हवेली), हिंजवडी आणि मारुंजी (ता. मुळशी) या चार ठिकाणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने लवकरच अग्निशमन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांमुळे किमान 25 किलोमीटरच्या परिसरातील 50 गावांतील सहा लाख नागरिकांना अग्निशमन सेवा उपलब्ध होणार आहे. 

पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात वाघोली येथे अद्यावत वाहनांसह सुसज्ज अशा अग्निशमन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. या केंद्रात कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारतीसह किमान तीन अग्निशमन वाहनांसाठी गॅरेज व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या केंद्रासाठी अद्ययावत अशा अग्निशमन वाहनांच्या बांधणीचे काम सुरू आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस हे केंद्र कार्यान्वित होईल. या केंद्रासाठी सुमारे 15 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली. 
यासह प्राधिकरण क्षेत्रातील एकात्मिक वसाहतींनी विकसित केलेली अग्निशमन केंद्र नांदेड सिटी, ब्लू रिज हिंजवडी आणि मारुंजी या ठिकाणी प्राधिकरणामार्फत कार्यान्वित करण्यात येत आहेत. या केंद्रांमध्ये 55 मीटर उंचीच्या शिड्या असणाऱ्या तीन गाड्यांचा ताफा उपलब्ध होणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी किमान 30 कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत. 

पीएमआरडीएच्या क्षेत्रात नागरी व औद्योगिक विकास जलदगतीने होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना व उद्योगांना संरक्षण देण्यासाठी अद्ययावत सेवा पुरविण्यास प्राधिकरण कटिबद्ध आहे. 
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए 
 
Web Title: four fire extinguishers from pmrda