CoronaVirus : अष्टविनायकांमधील 'ही'चार गणपती मंदिरे बंद

Four Ganapati temple in Ashtavinayak closed due to Corona Virus
Four Ganapati temple in Ashtavinayak closed due to Corona Virus

शिक्रापूर(पुणे) : अष्टविनायकांमधील मोरगाव, सिद्धटेक, थेऊर व रांजणगाव या चार देवस्थानांनी 31 मार्चपर्यंत भाविकांना देवदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला असून, धार्मिक दृष्ट्या व राज्यातील भाविकांसाठी हा मोठा निर्णय म्हणावा लागेल.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेले अष्टविनायक गणपती. लोखो भाविक येथे दररोज भेट देत असतात. पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून
मोरगाव, सिद्धटेक, थेऊर आणि रांजणगावच्या देवस्थनांनी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

Coronavirus : राज्यात कोरोनाचा पहिला बळी मुंबईत!
दरम्यान, मोरगाव, सिद्धटेक, थेऊर देवस्थानच्यावतीने प्रवक्ते-विश्वस्थ अॅड. राजेंद्र उमाप यांनी 31 मार्च पर्यंत ही देवस्थान बंद ठेवण्याची तारीख जाहीर केली, तर रांजणगाव देवस्थानच्यावतीने उपाध्यक्ष नारायण पाचुंदकर यांनी देवस्थान पुन्हा सुरू करण्याची तारीख शासनाच्या निर्णयावर सोपविली आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com