रांजणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या व एका बोकड ठार

दिवसाही बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली शेळी.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली शेळी.Sakal

निरगुडसर - आता दिवसाही बिबट्याचे ह ल्ले होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशाच प्रकारची घटना आंबेगाव तालुक्यात रांजणी येथील पळस मळ्यात घडली आहे. येथील शांताराम रामभाऊ वाघ यांच्या तीन शेळ्या व एका बोकडला बिबट्याने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवार ता. 22 रोजी दुपारी घडली. रांजणी ते मंचर रस्त्यावर पळसमळा असून येथे शांताराम रामभाऊ वाघ हे शेतकरी राहतात. त्यांच्याकडे एकुण अकरा शेळ्या व काही बोकड आहेत, घराशेजारी चिकूची बाग असून या बागेमध्ये त्यांनी शुक्रवारी सकाळी सर्व शेळ्या व बोकड बांधले होते त्यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास शांताराम वाघ हे घरात जेवणासाठी गेले त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून तीन शेळ्या व एका बोकडाला जागीच ठार केले. तसेच एका बोकडाला तो फरफटत ओढत असताना बोकडाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेतकरी शांताराम रामभाऊ वाघ हे घराबाहेर पळत आले.त्यावेळेस बिबट्याने बोकडाला सोडून चिकूच्या बागे पलीकडे धुम ठोकली.त्यामध्ये एक बोकड जखमी झाला आहे.

यामध्ये शांताराम रामभाऊ वाघ यांचे जवळपास 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,वनविभागाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. चौकट.. रांजणी परिसरात बिबट्याची डरकाळी वाढली... रांजणी येथील कारमळा येथे सात दिवसापूर्वी ऊसतोड सुरू असताना दोन बछडे सापडल्याची घटना घडली होती त्यानंतर वनविभागाने ते बछडे त्याच ठिकाणी ठेवल्यानंतर त्याच दिवशी रात्री बिबट मादी आपल्या पिल्लांना सुखरूप घेऊन गेली त्यामुळे परिसरात मादी सह बछड्याचा वावर आहे तसेच परिसरात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे आणि काल तर भर दुपारी बिबट्याने हा हल्ला केल्याने बिबट्याची अजून दहशत वाढली आहे उसाचे क्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा शिल्लक नाही त्यामुळे बिबट्याचे दर्शन वाढले आहे तरी वनविभागाने तातडीने पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com