कुदळवाडीतील आगीत चार गोदामे खाक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण समजू शकले नाही.

चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण समजू शकले नाही.
 
कुदळवाडी-जाधववाडी रस्त्यावरील एका भंगाराच्या साहित्याच्या गोदामाला मध्यरात्री आग लागली. आग लागताच गोडाऊनमध्ये झोपलेले कामगार बाहेर पळाले. प्लॅस्टिक, कचरा आणि लाकडे असल्याने काही क्षणातच आग पसरली. शेजारच्या गोडाऊनला ही आग लागली. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी अग्निशामक दलाला कळविला. पावणेतीनच्या सुमारास अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत चार गोडाऊनला आग लागली होती. आगीचे स्वरूप पाहून जादा बंब बोलविले. पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाच्या सात व खासगी कंपन्यांचे तीन असे दहा बंब घटनास्थळी हजर झाले. तसेच अग्निशामक बंबांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाच खासगी टॅंकरची मदत घेण्यात आली. 

मोठे गोडाऊन, आगीचे रौद्ररूप आणि रस्त्याची अडचण यामुळे आग आटोक्‍यात येण्यास सकाळचे आठ वाजले. आता आग आटोक्‍यात आली असली तरी प्लॅस्टिक कचऱ्यामुळे ती आणखी काही दिवस धुमसत राहील, असे नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four godownsare burns in Kudalwadi fire