ट्रकला मोटारगाडीच्या धडकेत चार ठार

महेंद्र शिंदे
सोमवार, 25 जून 2018

दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर येथे आले असता येथील हॉटेल सागरसमोर थांबलेल्या ट्रकला मोटरगाडी पाठीमागुन धडकली.

खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर येथे हॉटेल सागर समोरील रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला मोटारगाडीने पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले.

आश्विनी आसवले, उज्वला  सणस, अरुणा भोसले (सर्व रा. पुणे) आणि ओंकार पोळ (रा. शिंदेवाडी, ता. भोर) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हे चौघेजण मोटारगाडीने सोमवारी पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर येथे आले असता येथील हॉटेल सागरसमोर थांबलेल्या ट्रकला मोटरगाडी पाठीमागुन धडकली. या अपघातात गाडीतील चार जण जागीच ठार झाले. पोळ हा गाडी चालवत होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरीकांनी तातडीने मृतदेह बाजूला काढले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Four killed in car accident at pune satara road