CET : 3 लाख 89 हजार विद्यार्थी अजमावताहेत नशीब

संतोष शाळीग्राम
गुरुवार, 11 मे 2017

राज्यभरातील एकूण 3 लाख 89 हजार विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आज नशीब अजमावत आहेत. पुणे केंद्राअंतर्गत 42 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत.

पुणे : अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आज (गुरुवार) दहा वाजता सुरू झाली. राज्यभरातील एकूण 3 लाख 89 हजार विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आज नशीब अजमावत आहेत. पुणे केंद्राअंतर्गत एकूण 42 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत.

पुण्यात 99 केंद्रावर परीक्षेसाठी विद्यार्थी जमू लागले होते. परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव सुरु होती. नीट परीक्षेवेळी जाचक नियमांचा सामना विदयार्थ्यांना करावा लागला होता. सकाळी साडेनऊ वाजता या परीक्षेची केंद्रे बंद करण्यात आली. याची धास्ती पालकांना आणि विद्यार्थांना होती. त्यामुळे दीड तास आधीच ते केंद्रांवर पोचले होते. 

सीईटीचा पहिला पेपर दहा वाजता सुरू झाला. या परीक्षेमध्ये एकूण तीन पेपर होत आहेत. शेवटचा पेपर तीन वाजता सुरू होऊन साडेचार वाजता संपेल.
 

Web Title: four lac students appear for CET in maharashtra