नगरसेवक खूनप्रकरणी चौघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

आळंदी - भाजपचे आळंदीतील नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या खून प्रकरणी चार संशयितांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कांबळे यांचा मृतदेह बुधवारी (ता. २७) सकाळी वायसीएम रुग्णालयातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी दिघी ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तणाव निवळला. आरोपींना मोक्का लावण्याची मागणी नातेवाइकांनी केली.

पुणे - आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे कांबळे यांचा मंगळवारी (ता. २६) कोयत्याने वार करून खून करण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी सकाळी  नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेत दिघी पोलिस ठाण्यासमोर ठेवत पोलिसांचा  तीव्र निषेध केला. 

दिघी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, मास्टरमाइंडचा शोध सुरू असल्याचे सांगितल्यानंतर कांबळे यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि आमदार बाळा भेगडे यांनी कांबळे यांच्या नातेवाइकांची भेट घेतली. इंद्रायणीतीरी कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, या खुनातील आरोपींपैकी चार जणांना दिघी पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतल्याची चर्चा होती. मात्र, प्रमुख आरोपींसह आणखी एक आळंदीतील असून तो अल्पवयीन असल्याचे समजते. पोलिसांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला.  

बालाजी कांबळे यांच्या खुनातील आरोपींना प्रशासनाने दयामाया दाखवू नये. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.  
- बाळा भेगडे, आमदार

‘मोक्का’नुसार कारवाई व्हावी
राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले,‘‘हे गुन्हेगार सराईत असल्याने त्यांच्यावर मोक्‍कानुसार कारवाई व्हावी. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक ठिकाणी काम करताना पोलिसांनी मागेल तेव्हा संरक्षण देणे आवश्‍यक आहे. आळंदीसारख्या ठिकाणी अशी घटना घडणे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. आरोपींच्या पाठीशी असणाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे.’’  

Web Title: Four members arrested of the corporator murdered