रिक्षात सापडले चार महिन्याचे गाेंडस बाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षात सापडले चार महिन्याचे गाेंडस बाळ
रिक्षात सापडले चार महिन्याचे गाेंडस बाळ

रिक्षात सापडले चार महिन्याचे गाेंडस बाळ

खेड-शिवापूर : खेड शिवापूर दर्गा (ता.हवेली) येथे गुरुवारी रात्री वाहनतळावर उभ्या असलेल्या रिक्षात चार महिने वयाचे स्त्री जातीचे बालक आढळून आले. राजगड पोलिसांनी या बालकाला ताब्यात घेऊन त्याची देखभाल केली आहे. तसेच त्या बालकाला ससून येथील सोफोश संस्थेत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालन पोषणाची जबाबदारी झटकून बाळ सोडून देणाऱ्या अज्ञात पालकांवर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. तौफिक करमुद्दीन शेख हे कुटुंबासह पुण्याहून खेड-शिवापूर येथील दर्ग्यावर दर्शनासाठी आले होते.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दर्ग्याजवळील वाहनतळावर रिक्षा उभी करून ते दर्शनासाठी गेले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते दर्शन करून रिक्षाजवळ आले असता त्यांना रिक्षाच्या पाठीमागच्या सीटवर अंदाजे चार महिने वयाचे स्त्री जातीचे बाळ आढळून आले. त्यांनी आजूबाजूला त्या बाळाच्या पालकांची चौकशी केली. मात्र त्या बाळाचे पालक कोणी आढळले नाही. त्यामुळे त्यांनी सदर प्रकार राजगड पोलिसांना सांगितला. राजगड पोलिसांनी सदर बाळाला ताब्यात घेऊन त्याची देखभाल केली. तसेच त्या बालकाला ससून येथील सोफोश केंद्रात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर चार महिने वयाच्या बाळाला सोडून निघून गेल्याप्रकरणी अज्ञात आई-वडिलांविरोधात राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Four Month Old Baby Found In Rickshaw Crimes Filed Against Parents Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top