पुण्यातील चार संस्थांचा एआयसीटीईकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील ३० संस्थांना उत्तम कार्यपद्धती म्हणून गौरविले आहे. यात महाराष्ट्रातील आठ आणि पुणे जिल्ह्यातील चार संस्थांचा समावेश आहे.

पुणे - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील ३० संस्थांना उत्तम कार्यपद्धती म्हणून गौरविले आहे. यात महाराष्ट्रातील आठ आणि पुणे जिल्ह्यातील चार संस्थांचा समावेश आहे.

तंत्रशिक्षण परिषदेने मान्यताप्राप्त संस्थांच्या उत्तम कार्यपद्धतीचा अहवाल केला असून, त्यात या संस्थांचा उल्लेख केला आहे. गौरविण्यात आलेल्या संस्थांमधील विशेष उपक्रम, कार्यपद्धतीची नोंद घेण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी परिषदेने उत्तम कार्यपद्धती करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची माहिती मागविली होती. त्यात जवळपास तीनशे संस्थांनी प्रस्ताव पाठविले होते. प्रस्तावाची छाननी करून त्यातील ५० संस्थांची निवड करण्यात आली. अंतिम निवडीमध्ये ३० संस्थांची निवड करण्यात आली. 

एआयसीटीईने गौरवलेल्या शिक्षण संस्था -
    ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (पुणे)
    आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (पुणे)
    विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्‍निक कॉलेज (इंदापूर-पुणे)
    कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पुणे)
    इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (माटुंगा)
    डी. के. टी. ई. एस. टेक्‍स्टाइल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, (इचलकरंजी- कोल्हापूर)
    वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सांगली)
    वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (सोलापूर)

‘उत्तम कार्यपद्धती’ म्हणून निवडलेल्या ३० संस्थांचा अहवाल पहिल्यांदाच संकेतस्थळावर अपलोड केला आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था अजूनही परिषदेकडे प्रस्ताव पाठवू शकतात. येणाऱ्या प्रस्तावावरून  अहवालाचा विस्तार वाढविण्यात येईल.
- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

एआयसीटीईमध्ये सर्वांना हितकर ठरतील, अशा कार्यपद्धती वापरण्यावर भर असतो. पर्यावरण रक्षण शक्‍य होईल, अशा कार्यपद्धती वापरण्याचा आमचा निश्‍चय यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे.
- ब्रिगेडिअर अभय भट, संचालक, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी

Web Title: four organisation homage by AICTE