सिलिंडरच्या स्फोटात पिंपरीत चार जण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पिंपरी : नेहरूनगर भागातील एका घरात गॅसगळतीनंतर झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठच्या सुमारास घडली.

दुर्वेश सिंग (वय १२), शिवा सिंग (वय १०), संदीप सिंग (वय २१) आणि लबलादेवी सिंग (वय ३२, सर्व रा. वसंतदादा पाटील विद्यालयाच्या मागे, नेहरूनगर, पिंपरी) अशी स्फोटात जखमी झालेल्या व्यक्‍तींची नावे आहेत. यात शिवा सिंग हा ६३ टक्‍के भाजला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की घराच्या छताचे पत्रेदेखील उडाले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझविली.

सिंग यांच्या घरात असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरमधून रात्रभर गळती झाली. त्यानंतर सकाळी लाइटचे बटण सुरू केले असता, त्यातून निघालेल्या ठिणगीचा गॅसची संपर्क आला आणि स्फोट झाला. साचलेल्या गॅसचा आगीशी संपर्क आल्यावर स्फोट होताना गॅसची विध्वंस क्षमता अडीचशे पटीने वाढते. यामुळे कधी-कधी घराच्या भिंतीही पडतात.

Web Title: four people injured in cylinder blast at pimpari