बिबट्याच्या हल्यात चार जण जखमी

पराग जगताप
शुक्रवार, 22 जून 2018

जुन्नर - बनकरफाटा जुन्नर मार्गावर बिबट्याचा दुचाकिवर हल्ला वेळवेगळ्या दुचाकिवरील चार जण जखमी.

बनकरफाटा जुन्नर मार्गावर पांगरिमाथ्याच्या मागे सटवाई देवी परिसरात गुरुवारी सायंकाळी बिबट्याने दुचाकिला लक्ष करुन चार दुचाकि वरील तीन पुरुष व एका महिलेला जखमी केले आहे.

जुन्नर - बनकरफाटा जुन्नर मार्गावर बिबट्याचा दुचाकिवर हल्ला वेळवेगळ्या दुचाकिवरील चार जण जखमी.

बनकरफाटा जुन्नर मार्गावर पांगरिमाथ्याच्या मागे सटवाई देवी परिसरात गुरुवारी सायंकाळी बिबट्याने दुचाकिला लक्ष करुन चार दुचाकि वरील तीन पुरुष व एका महिलेला जखमी केले आहे.

याबाबत ओतूर वनविभागाचे प्रभारी अधिकारी विशाल अडगळे म्हणाले कि जुन्नर वरुन बनकरफाटा मार्गे गायमुखवाडीला चाललेले तैसिफ मिया शेख व नुरमोहमद रशीद शेख यांच्या गाडिवर पांगरिमाथा ते बनकरफाटा दरम्यान उसातून येवुन दुचाकिवर झेप घेतली दुचाकिवर मागे बसलेले नुरमोहमद शेख जखमी झाले. त्याना स्थानिकानी उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, त्यानंतर संदिप रघुनाथ शिंदे त्या मार्गाने पाऊने सात दरम्यान जुन्नर वरुन घरी उदापूरला येत होते. त्याच्यावरही बिबट्याने त्याच ठिकाणी हल्ला करुन त्याना जखमी केले. तसेच त्यानंतर सात ते सव्वा सात दरम्यान दिपक मुरलिधर उकिर्डे व त्यांची बहिन आशा महेंद्र कुमकर हे जुन्नर वरुन बनकरफाटा येथे घरी येत असताना त्याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. त्यात दुचाकिवर मागे बसलेल्या अशा कुमकर याना बिबट्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तर दुचाकि पडल्यामुळे दिपक उकिर्डे याना ही मुका मार लागला आहे. त्यानंतर आठ दरम्यान ओमकार पारधी व गणपत भले हे याच मार्गाने डिझेलचे कॅन घेवुन दुचाकिवर येत असताना त्याच उसा जवळ बिबट्याने त्याच्या दुचाकिवर हल्ला केला. कॅन्डमुळे झेप थोडी फसली तरी त्यात ओमकार पारधीला बिबट्याची नखे लागली सर्व जखमीना ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. असुन पुढील उपचारासाठी व बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी पिंपरीचिंचवड येथिल शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले. असल्याचे ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.वाय.एम.शेखरे यानी सांगितले. 

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्याची घटना समजताच जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यानी जखमीची भेट घेवुन विचार पुस केली. तसेत हल्ला होत असलेल्या ठिकाणीही भेट देवुन पहाणी केली. तसेच वनविभागाच्या कर्मचार्यांनी रात्री उशीरा पर्यत बनकरफाटा जुन्नर मार्गावर गस्त घालुन वाहन चालकाना संतर्क केले. तर परिसरातील नागरिकानी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावायची मागणि केली आहे.

Web Title: Four people injured in leopard's attack