अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंगबद्दल चार विद्यार्थी अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे - येवलेवाडी परिसरातील सिंहगड टेक्‍निकल अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याच्या आरोपावरून आठ विद्यार्थ्यांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डोक्‍यावर आरसा फोडून संबंधित विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे. 

याप्रकरणी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्याचबरोबर प्रथम वर्षात शिकणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व विद्यार्थी 19 ते 21 वर्षे वयोगटातील असून, अभियांत्रिकीच्या विविध शाखांत शिक्षण घेत आहेत. संबंधित विद्यार्थी राहत असलेल्या वसतिगृहातील खोलीत शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ते आले. महाविद्यालयातील वादातून त्यांनी फिर्यादी विद्यार्थ्यास मारहाण केली. त्याच्या डोक्‍यावर आरसा फोडून त्याला जखमी केले. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने पालकांशी संपर्क साधला. त्याचे पालक जळगाववरून आले. मुलाची जखमी अवस्था पाहून त्यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि रॅगिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यातील चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. विद्यार्थी राहत असलेल्या वसतिगृहात शनिवार- रविवारी वसतिगृह अधीक्षक नसतात. त्यामुळे ही घटना घडल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील फौजदार एस. एस. काळे तपास करीत आहेत.

Web Title: Four students arrested for rugging at engineering college