दिल्लीतील संचलनासाठी भोरमधील चौघांची निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

भोर : दिल्ली येथील राजपथावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी येथील राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या एका विद्यार्थिनीसह चौघांची निवड झाली आहे.

ऋषिकेश वीर (रा. उत्रौली), वैभव मांढरे (रा. गुठाळे, ता. खंडाळा, जि. सातारा), आनंद सुतार (रा. उत्रौली) आणि प्रणाली तारू (रा. भोर) यांची संचलनासाठी निवड झाली असून, ते दिल्लीला रवाना झाले आहेत. अशी माहिती अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली.

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील एनसीसी आर्मी विभागाचे प्रमुख एस. जी. साळुंके आणि एनसीसी नेव्हल विभागाचे प्रमुख एस. एल. उल्हाळकर यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय "एनसीसी'च्या महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन टी. के. सुरेशकुमार आणि महाराष्ट्र गर्ल्स बटालियन प्रमुख कर्नल ओ. पी. पांडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक-अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, सचिव डॉ. भाग्यश्री पाटील आदींसह प्राध्यापकांनी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Four students from Bhor to participate in Republic Day parade