esakal | बनावट मार्कलिस्ट दाखवून एमबीएला प्रवेश, पुढे काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

four students mba admission by duplicate marksheet pune university

विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या गुणपत्रिकांची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाकडून त्या एटीएमएकडे पाठविण्यात आल्या.

बनावट मार्कलिस्ट दाखवून एमबीएला प्रवेश, पुढे काय घडले?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : एमबीएला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षेची बनावट गुणपत्रिका दाखवू करून झारखंड व बिहारमधील चार विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रवेश घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अपराजिता राज (रा. बिस्तुपूर कालीमाली, जमशेदपूर, झारखंड), भोमिरा (रा. मानपुर, बिहार), दिव्या सिंग (रा. ग्लोमोरी सिगबम, झारखंड) आणि शैलेश कुमार सिंग (रा. जमशेदपूर, झारखंड) अशी या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी डॉ. सुरभी प्रवीण जैन यांनी विद्यापीठाच्या वतीने फिर्याद दिली आहे. डॉ. जैन या विद्यापीठात प्राध्यापक असून त्या मॅनेजमेंट सायन्सेस या विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

कसा उघड झाला प्रकार?
आरोपींनी एमबीएला प्रवेश घेण्यासाठी एटीएमए (एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन्स) संस्थेची बनावट गुणपत्रिका सादर केली. त्याआधारे त्यांनी 2018-2019 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठात एमबीएसाठी प्रवेश घेतला. प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या गुणपत्रिकांची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाकडून त्या एटीएमएकडे पाठविण्यात आल्या. तेव्हा त्यांच्याकडून या गुणपत्रिका आम्ही दिलेल्या नसून, त्या बनावट असल्याची माहिती देण्यात आली. हा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठाकडून या चार विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.