पुणे जिल्ह्यात सव्वाचार हजार मुले शालाबाह्य

गजेंद्र बडे
Thursday, 4 March 2021

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो मुले आजही शिक्षणापासून कोसो दूर असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील ४ हजार २७९ मुलांनी अद्याप शाळा किंवा अंगणवाडीची पायरीही चढली नसल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली. 

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो मुले आजही शिक्षणापासून कोसो दूर असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील ४ हजार २७९ मुलांनी अद्याप शाळा किंवा अंगणवाडीची पायरीही चढली नसल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्हा परिषदेने २२ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे. राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याची अंमलबजावणी २०१० पासून सुरु झाली आहे. त्यानुसार सरकारने २०११ मध्ये नियमावली तयार केली. त्यात ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. तरीसुद्धा आजही १०० टक्के बालके शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.  ग्रामीण भागात पुन्हा एकदा हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षणापासून दूर
शिक्षणापासून दूर असलेल्यांमध्ये ऊसतोडणी कामगार, उद्योग, गुऱ्हाळांवरील कामगार, उद्योग, कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, गरजाधिष्ठित विशेष मुले, वीटभट्टी, दगडखाणी, शेतमजूर, बांधकाम व्यवसाय कामगारांच्या मुलांचे प्रमाण अधिक.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Thousands of out of school children in Pune district