पुणे- मुंबई द्रुतगतीवर चार वाहनांचा विचित्र अपघात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

लोणावळा : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ शनिवारी (ता.१८) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात ट्रकचालकाच्या पायाला दुखापत झाल्याने चालक जखमी झाला आहे.

दरम्यान द्रुतगतीवरील वाहतुक फारशी विस्कळीत झाली नाही. लोणावळा, खंडाळा परिसरात सध्या पाऊस सुरु आहे. अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतारावर भरधाव वेगामुळे कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या दोन मोटारींना धडक दिली. याचवेळी मागुन येणारा दुसरा कंटेनर या कंटेनरवर आदळला.

यामुळे कंटेनरचालक जखमी झाला. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून द्रुतगतीवरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती समजताच आयआरबी कंपनीचे कर्मचारी, देवदूत पथक व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल होत वाहतुक सुरळीत केली.

Web Title: Four vehicles accidents on Pune-Mumba highway