सराईत वाहनचोरांकडून चार मोटारी जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

पुणे - बनावट नंबरप्लेट लावून वाहन चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी (उत्तर) पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 16 लाख रुपये किमतीच्या चार मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

इस्माईल सुलेमान लांडगे (वय 40, रा. मोमिनुपरा, पुणे) आणि उस्मान सय्यद (रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे सराईत वाहनचोर असून, त्यांच्याविरुद्ध मुंबईतील माटुंगा, चेंबूर आणि मालाड पोलिस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. इस्माईल हा गॅरेज चालवत असून, दोघे संगनमताने

मोटारी चोरून विक्री करत होते. इस्माईल लांडगे हा बनावट नंबरप्लेट असलेली सॅंट्रो मोटार विकण्यासाठी खराडी येथील जुन्या जकात नाक्‍याजवळ बुधवारी येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी (उत्तर) पथकाला मिळाली. तसेच औंध परिसरात अल्पवयीन मुलांनी दुचाकी चोरी केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्‍त दीपक साकोरे, पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्‍त अरुण वालतुरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक रणजित भोईटे, पोपटराव गायकवाड, कर्मचारी अब्दुल सय्यद, विष्णू पाडोळे, दत्ता फुलसुंदर आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Four vehicles seized four cars

टॅग्स