रस्त्याच्या संपादित जमिनीसाठी चारपट मोबदला - प्रांत अधिकारी 

Fourth of the compensation for  land acquisition  of the road - province officials
Fourth of the compensation for land acquisition of the road - province officials

उंडवडी : "संत तुकाराम महाराज पालखी महामर्गावरील बारामती - पाटस या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीला चारपट मोबदला दिला जाईल. या रस्त्यात येणारी घरे, गाळे, दुकाने, यांना एकसारखा आणि एकाच वेळी मोबदला मिळणार आहे. जुना रस्ता सोडून नवीन रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनींचे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. या पैशासाठी शेतकऱ्यांना आमच्याकडे यावे लागणार नाही. संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आम्ही जमा करू.'' अशी माहिती बारामतीचे प्रांतअधिकारी हेमंत निकम यांनी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत दिली.

उंडवडी सुपे, खराडेवाडी, जराडवाडी, उंडवडी कप या गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी संपादित होत असलेल्या जमिनी संदर्भात प्रांत अधिकाऱ्यांकडे हरकती दाखल केल्या होत्या. या हरकतीवर आज संबंधित गावात बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सुनावणी घेतली. यावेळी उंडवडी सुपे येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत निकम बोलत होते.

यावेळी सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, माजी सरपंच बापूराव गवळी, मंडल अधिकारी राहुल जगताप, ग्रामपंचायत सदस्या रंजना गवळी, रेणुका गवळी, मंगल गवळी, सुनीता माकर, ज्ञानदेव जगताप, भगवान माकर, पोलीस पाटील सविता गवळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गवळी, सुनील भोसले, ग्रामसेवक विनोद आटोळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

निकम पुढे म्हणाले, ''1889 चा कायदा शासनाने रद्द करुन 2013 च्या कायद्यानुसार रस्त्यासाठी संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला गेल्या दोन - तीन वर्षात झालेल्या खरेदी विक्रीच्या भावानुसार चारपट पैसा मिळणार आहे. सर्व पैसा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्या गटात जास्त नावे आहेत, पण वहिवाटदार जो आहे, त्याची पाहणी करुन त्यालाच पैसे मिळणार आहेत.

तसेच चार हिस्से असतील तर लेखी अर्ज करुन समान हिस्सा वाटप करण्यात येणार आहे. हा रस्ता 45 मीटर रुंदीचा काही ठिकाणी 20 मीटर तर काही ठिकाणी 25 मीटर देखील आहे. काही ठिकाणी रस्ताच्या दोन्ही बाजुला समान आहे. तसेच वळणावर कमी अधिक प्रमाणात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेवू नये. सरकार पैसे द्यायला तयार आहे, रस्त्याचे काम लवकर सुरु करा असा सरकारचे  मत आहे.

 रस्त्यासाठी जमिनीची मोजणी झाली आहे, आम्ही लवकरच संपादित क्षेत्राचा नकाशा प्रसिद्ध करू. आणि मग जमिनीचे पैसे देवून रस्त्याचे काम केले जाईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com