धर्माधर्मांत पूल बांधूया - फ्रान्सिस दिब्रिटो

francis dibrito
francis dibrito

पुणे - ख्रिस्तांकडून आम्ही तुकोबांकडे आलो आहोत. आपण धर्माधर्मांत भिंती नको, तर पूल बांधूया, असे सांगताना आपण जय जगत का म्हणत नाही, निसर्गाकडे का पाहात नाही; निसर्ग आपल्याला विविधतेत एकता शिकवतो, तोच आपला खरा गुरू आहे, अशी भावना उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केली.

दिब्रिटो यांनी आज ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयास सदिच्छा भेट दिला. संपादकीय सदस्यांबरोबर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पुण्यातील वास्तव्याच्या आठवणीदेखील त्यांनी सांगितल्या. स्नेहसदनमध्ये असताना पुणे मला अधिक जवळून ओळखता आले. पुणे हे पुस्तकप्रेमी शहर आहे. या शहराने माझे खूप लाड केले आहेत. त्यात ‘सकाळ’ हे सर्वांचे आवडते वर्तमानपत्र. त्याने आम्हासारख्या लोकांना लिहिण्याची प्रेरणा दिली, सामर्थ्य दिले, असेही ते म्हणाले.

‘आम्ही वसईला असल्याने मराठी बोलत असू. मराठीशी आमचे खूप जुने नाते आहे. पण शाळेत मला मराठीचे सौंदर्य उमगले. पु. ल. देशपांडे यांचा आणि माझा स्नेह होता. ते म्हणायचे, ‘‘तुम्हाला चांगली मराठी शिकायची ना? मग तुम्ही तुकाराम वाचा.’’ त्यांनी मला 

तुकाराम महाराज वाचायला सांगितले, त्यातून माझ्यातील मराठी भाषा समृद्ध होत गेली. समाजाशी आमच्या कुटुंबाची नाळ जोडली गेलेली होतीच. माझ्या बाबांचा सर्वधर्मीयांशी स्नेह होता. प्रत्येक गावात एक घर बांधा असे ते सांगायचे, म्हणजे प्रत्येक गावात एक घर जोडा असे ते सांगत. मोठ्या भावाने दूध उत्पादक संघाची स्थापना केली होती, त्यामुळे आमचे घर समाजकार्याशी संबंधित होते,’’ असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com