बिग बजारची ऑफर पडली दीड लाखाला 

ब्रिझमोहन पाटील
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

''बिझ बाजारमध्ये ऑफर सुरू आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल'' अशी बातवणी करून क्रेडीट कार्डची गोपनिय माहिती घेऊन 1 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे :''बिग बजारमध्ये ऑफर सुरू आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल'' अशी बातवणी करून क्रेडीट कार्डची गोपनिय माहिती घेऊन 1 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

महंमदवाडी येथे राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास एकाने फिर्यादी यांना मोबाईलवर फोन केला. ''मी एसबीआय मधून बोलत आहे, तुम्हाला बिग बाजारची पाच हजार रुपयांची ऑफर आहे. त्यातून तुम्हाला फायदा होईल'' अशी बतावणी केली. त्यासाठी त्यांच्याकडून क्रेडीट कार्डचे शेवटचे चार अंक व मोबाईलवर आलेला ओटीपी सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या क्रेडीट कार्डवरून 1 लाख 47 हजार रुपयांचा व्यवहार करून फसवणूक केली.

पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) एम. एस. कुंभार करत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of 1.5 lakhs by showing offers of Big Bazaar