esakal | मंचर : मुकादमांकडून ७१ लाखांची फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

मंचर : मुकादमांकडून ७१ लाखांची फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल}

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या (२०२०-२१ हंगाम) आठ ऊस वाहतुकदारांची सात मुकादमांनी ७१ लाख १२ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली.

मंचर : मुकादमांकडून ७१ लाखांची फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मंचर (पुणे) : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या (२०२०-२१ हंगाम) आठ ऊस वाहतुकदारांची सात मुकादमांनी ७१ लाख १२ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सात जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यातील तिघांना अटक केली आहे. घोडेगाव न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी ऊस वाहतूकदार नवनाथ कोंडीभाऊ शिंदे (रा. साकोरे, ता. आंबेगाव) यांनी फिर्यादी दिली. 

मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा बदला

गुन्हा दाखल झालेल्या मुकादामांची नावे व कंसात फसवणूक झालेली रक्कम : श्रावण जगन राठोड (चार लाख २२ हजार रुपये), रमेश बबन राठोड (२६ लाख ५० हजार रुपये), कैलास रायसिंग चव्हाण (नऊ लाख ५० हजार रुपये), अमरसिंग गबरू राठोड (आठ लाख ५० हजार रुपये), कैलास चत्रू राठोड, (पाच लाख रुपये, सर्व रा. चंडिकावाडी ता. चाळीसगाव), अनिल पंडित जाधव (सात लाख ५० हजार रुपये, रा. बोंढरे, ता.चाळीसगाव) नितीन प्रल्हाद पाटील (चार लाख ८५  हजार रुपये, रा. डोनातगिरी, ता. चाळीसगाव). 

पुण्यात खरेदीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; डाळज येथे भीषण अपघातात 3 ठार

करारनुसार या मुकादामांच्या खात्यावर शिंदे यांनी वेळोवेळी रक्कम वर्ग केली. मात्र, मुकादमांनी कोयते न पुरवता आठ शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले. श्रावण राठोड, नितीन पाटील आणि अनिल जाधव या तिघांना पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले यांच्या पथकाने चाळीसगाव व राहुरी (जि. नगर) परिसरातून अटक केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्य फरारी असलेल्या चार ऊसतोड मुकादामांचा शोध पोलिसांचे पथक घेत आहे. ऊसतोड मुकादम यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्यास संबंधितानी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. 
- सुधाकर कोरे, पोलीस निरीक्षक, मंचर