तरुणीला फसविणाऱ्यास दिल्लीतून घेतले ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

पुणे : शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करणाऱ्या तरुणीस भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तत्काळ चक्रे फिरवून दिल्ली येथून एका नायजेरियन तरुणास ताब्यात घेतले. 

पुणे : शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करणाऱ्या तरुणीस भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तत्काळ चक्रे फिरवून दिल्ली येथून एका नायजेरियन तरुणास ताब्यात घेतले. 

ऍटेसे शिरगे (वय 30, रा. मेघालय, सध्या मोहन गार्डन, दिल्ली) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शिरगे याने फेसबुकद्वारे संबंधित तरुणीशी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने तिला मे 2018 रोजी एका भेटवस्तूचे छायाचित्र पाठविले. एक आठवड्यानंतर एका प्रिया शर्मा नावाच्या महिलेने तरुणीला फोनद्वारे एअरपोर्टवरून बोलत असल्याचे सांगून त्यांच्यासाठी परदेशी चलन आले असून, ते सोडविण्यासाठी सव्वा लाख रुपये एका बॅंक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने ही रक्कम भरली. त्यानंतर शिरगेने तिच्याशी होणारा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे फिर्याद दिली. 

दरम्यान, पोलिसांनी मोबाईल व बॅंक खात्याच्या माध्यमातून संबंधिताचा शोध घेतला. त्या वेळी तो दिल्ली येथे असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, पोलिस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीस दिल्लीतून अटक केली. त्याच्याकडून 17 मोबाईल हॅण्डसेट, सात सिमकार्ड, सहा डेबिट कार्ड, चार पासबुक, एक चेकबुक हस्तगत केले. पुढील कारवाईसाठी त्याला वानवडी पोलिसांकडे सोपविले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud arrested from delhi