फेसबुकवरून लाखाचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - डोळे तपासणीच्या मशिनची फेसबुकवरून जाहिरात करून वस्तू देण्याचे आमिष दाखवून तरुणास एक लाख रुपयांना गंडा घातला. 

पुणे - डोळे तपासणीच्या मशिनची फेसबुकवरून जाहिरात करून वस्तू देण्याचे आमिष दाखवून तरुणास एक लाख रुपयांना गंडा घातला. 

या प्रकरणी सचिन चक्रनारायण (वय 31, रा. थेरगाव) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सिद्धार्थ जितेंद्र राजगुरू (वय 32, रा. वेलजापूर, अहमदाबाद) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजगुरू याने फेसबुकवर डोळे तपासणी मशिन विक्रीची जाहिरात केली होती. ही जाहिरात चक्रनारायण यांनी पाहिल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीस फेसबुकद्वारे संपर्क साधला. त्यानंतर राजगुरू याने त्यांना अहमदाबाद येथील एका खासगी बॅंकेचा खाते क्रमांक दिला. त्यानुसार संबंधित खात्यावर चक्रनारायण यांनी ठरल्यानुसार एक लाख रुपयांची रक्कम पाठविली. मशिन मिळण्यासाठी त्याच्याशी सातत्याने संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली. 

Web Title: Fraud case facebook one lakh loot