खडकीतील सराफांवर फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सराफ बाजारातील मॉर्डन ज्वेलर्सच्या सराफांवर फसवणूक केल्याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश शांतिलाल जैन व कमलेश शांतिलाल जैन अशी सराफांची नावे आहेत. 
 

खडकी - येथील सराफ बाजारातील मॉर्डन ज्वेलर्सच्या सराफांवर फसवणूक केल्याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश शांतिलाल जैन व कमलेश शांतिलाल जैन अशी सराफांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अक्षय अनंत शिंदे, (वय 29, रा. जुना बाजार, खडकी) यांनी 24 जुलै रोजी सोन्याची अंगठी खरेदी केली होती. ती अंगठी 23 कॅरेटची असल्याचे भासवून त्या दराने शिंदे यांच्याकडून रक्कम घेण्यात आली. दरम्यान, पावतीवर 23 कॅरेटचा उल्लेख नसल्याचे शिंदे यांनी जैन यांना विचारले असता, त्याची गरज नसल्याचे उत्तर जैन यांनी दिले. मात्र, संशय आल्याने शिंदे यांनी ती अंगठी रविवार पेठ येथील विजय ऍस्पे सेंटरमध्ये तपासणीसाठी दिली. त्या पडताळणीत ती अंगठी 16.71 कॅरेटची निघाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी जैन यांच्या विरोधात खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एम. एस. कांबळे करीत आहेत. 

Web Title: Fraud case on goldmaker in Khadaki