साडेअकरा लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

पुणे : आयुर्वेदिक स्टोअर्सच्या मालाची विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या रकमेपेक्षा कमी रक्कम दाखवून दोन कामगारांनी दोन वर्षांत साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी राजेश ठाकरे (वय 51, रा. त्रिमूर्तीनगर, नागपूर) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राधेश्‍याम रामबुथ मिश्रा (रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर), संजय प्रकाशचंद्र उपाध्याय (वय 34, रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ठाकरे यांचे रास्ता पेठेमध्ये बैद्यनाथ आयुर्वेदिक स्टोअर्स आहे.

राधेश्‍याम व संजय हे दोघेही तेथे नोकरीस आहेत. दोघांकडूनही दुकानातील माल विक्री केला जात होता, प्रत्यक्षात संबंधित मालाच्या कॉम्प्युटरवर खोट्या नोंदी दाखविल्या जात होत्या. या पद्धतीने मार्च 2016 ते मार्च 2018 या दोन वर्षांत हा अपहार केला आहे. 

Web Title: Fraud Case of Rs Eleven Lakh And Fifty Thousand