तुमच्या नावावर चुकून 6 टिव्ही बुक झाल्याचे सांगून अभियंत्याची फसवणूक; वाचा नक्की काय घडले?

Online fraud with computer engineer  while buying an online TV
Online fraud with computer engineer while buying an online TV

पुणे : नामवंत कंपनीत काम करणारा संगणक अभियंता ऑनलाईन टिव्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. नामांकीत कंपनीचा एका टिव्हीचे ऑनलाईन पैसेही भरतो. पण काही वेळाने त्यास "चुकून तुमच्या नावावर सहा टिव्ही बुकींग झाले आहेत. तुम्ही दोन टिव्हीचे पैसे भरा, तुम्हाला उर्वरीत चार टिव्ही मोफत मिळतील'' अशी बतावणी केली जाते. अखेर अभियंता नाईलाजास्तव संबंधीत व्यक्तींच्या बॅंक खात्यात सव्वा लाख रुपये भरतो. त्यानंतर त्यास ना टिव्ही मिळतो, ना त्याने भरलेले पैसे. टिव्हीच्या नावाखाली अभियंत्यास तब्बल सव्वा लाख रुपयांना गंडा घातला गेल्याची घटना पुढे आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी अभिजीत जगदाळे (वय 34, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. जगदाळे हे मगरपट्टा येथील एका नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून काम करतात. जगदाळे यांना टिव्ही खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन शोध घेतला. त्यावेळी त्यांना इंटरनेटवर बारग्रेन ब्रोस ऑनलाईन प्रॉडक्‍ट कंपनीची जाहीरात दिसली. त्यानुसार, त्यांनी तेथे पाहणी केली, तेव्हा त्यांना सॅमसंग कंपनीचा 65 इंची टिव्ही 35 हजार रुपयांना उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी एका टिव्ही खरेदी करण्यास पसंती दिली. त्यावेळी अनोळखी व्यक्तींनी त्यांना एका बॅंक खात्यावर संबंधीत टिव्हीचे 35 हजार रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यावर 35 हजार रुपये भरले. परंतु फिर्यादी यांना टिव्ही मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधीत कंपनीशी पुन्हा संपर्क साधला. त्यावेळी त्यांना अनोळखी व्यक्तींकडून वेगळीच माहिती मिळाली. फिर्यादी यांनी एका टिव्हीचे पैसे भरले. मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून चुकून फिर्यादीच्या नावावर सहा टिव्हीची कॉम्पुटरराईज्ड नोंदणी झाली, त्यामुळे फिर्यादी यांना सहा टिव्ही मिळतील, परंतु त्यासाठी आणखी एका टिव्हीचे पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीनी नाईलाजास्तव दुसऱ्या टिव्हीचे पैसे भरले. असे वेळोवेळी त्यांनी सव्वा लाख रुपये भरले, मात्र त्यांना एकही टिव्ही मिळाला नाही.

आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. सायबर पोलिसांकडून हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com