कस्टमचा अधिकारी असल्याची बतावणी करून कॉन्ट्रक्‍टरची फसवणुक 

Fraud with contractor by pretending to be a customs officer at pune
Fraud with contractor by pretending to be a customs officer at pune

पुणे : विमानतळावर कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करून संकेतस्थळावर जुन्या गाडीची विक्रीची जाहीरात केली. ही गाडी खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिव्हील कॉन्ट्रक्‍टरची 3 लाख 86 हजार 300 रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

संजय दास (रा. पश्‍चिम बंगाल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 45 वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिव्हील कॉन्ट्रक्‍टर आहेत. त्यांना चार चाकी गाडी विकत घ्यायची असल्याने त्यांनी क्वीवर डॉट कॉमवर जुन्या गाड्यांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना टोयोटा कंपनीची गाडी आवडली. त्यावरील मोबाईल क्रमांकावर फोन करून संपर्क साधला. त्यावेळी संजय दास याने तो विमानतळावर कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले. या गाडीवरील कर भरलेला नसल्याने ती ब्लॉक केली आहे, हा कर भरला तर गाडी मिळू शकते अशी बतावणी केली. फिर्यादी यांनी त्यांच्या बॅंक खात्यातून दास याच्या खात्यावर 2 लाख 86 हजार रूपये ट्रान्सफर केले. फिर्यादी हे गाडी घेण्यासाठी विमानतळावर गेले असता, दास याने ही गाडी सुरक्षा विभागाच्या ताब्यात आहे, तेथे कोणालाही जाता येत नाही, तुम्ही 1 लाख रूपये सिक्‍युरीटी चार्जेस भरल्यानंतर मी गाडी बाहेर आणुन देतो असे सांगितले. फिर्याद यांनी त्यावर विश्‍वास ठेऊन 1 लाख रूपये खात्यावर भरले. पण त्यानंतर दास याने फिर्यादी यांचा फोन उचलला नाही. त्यावेळी फिर्यादींना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) कुंभार करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com