जुन्नर : लावला लाल कांदा पण निघाला पांढरा कांदा

जुन्नर : लावला लाल कांदा पण निघाला पांढरा कांदा

ओतूर : पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्याने रांगड्या कांदाचे बी विकत घेऊन कांदा रोप तयार करून लाखो रुपये खर्च करून दिड एकर शेतात कांदा पिक घेतले. कांदा काढल्यावर सर्व कांदा सफेद (पाढऱ्या) रंगाचा निकृष्ट निघाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हा कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. कांदा हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कापताना कापणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यामुळे प्रत्येक वर्षी एकतर शेतकरी किंवा ग्राहक यांच्यापैकी एकाच्या डोळ्यात पाणी येते. सरकारच्या जय पराजयावर ही कांदा किंमतीचा परीणाम होतो. त्यामूळे कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये सरकार कडून करण्यात आला आहे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसमुळे कांदा रोपे सडून वाया गेली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावात व मिळेल त्या किंमतीत कांदा बी विकत घेऊन परत कांदा रोपे तयार करण्यात आली. यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून, कांद्याला डेंगळे येणे, कांदे न पोसणे, वेगवेगळ्या रंगाचे कांदे येणे असे प्रकार घडून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, नेतवड, माळवाडी, रोहोकडी, चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण व इतर गावांतील शेतकरी उच्च प्रतीच्या कांद्याचे उत्पादन करतात आणि तो कांदा चाळीत साठवणूक करून समाधानकारक बाजारभाव मिळेपर्यंत साठवून ठेवतात. मात्र मागील वर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांदा रोपे खराब झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी चढ्या भावाने कांदा बी व रोपे खरेदी केली. मात्र त्यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे.

पिंपळगाव जोगा येथील कांदा उत्पादक शेतकरी विलास गंगाराम एरंडे यांनी दिड एकर कांदा लागवड केली. त्यासाठी त्यांनी औरंगाबाद येथून कांदा बी विकत आणले आणि कांदा रोपे तयार करून कांदा लागवड केली. दीड एकर कांद्याचे उत्पादन करणाऱ्या साठी बी, रोप आणि लागवड, औषध फवारणी, खते, मजूरी असा एकूण दिड लाखापर्यंत उत्पादन खर्च झाला असून दिड एकर शेतात सर्व सफेद कांदा निघाला आहे. या सफेद कांद्याला बाजारभाव नाही. तसेच याची साठवणूक पण करता येईल की नाही याबाबत माहिती नाही.

त्यामुळे मिळेल त्या भावात हा सफेद कांदा विकावा लागणार असून कांदा व्यापारी ही या कांद्याच्या टिकवण क्षमते बाबत शंका व्यक्त करत आहे.जुन्नर तालुक्यातील खुपशा शेतकऱ्यांच्या शेता या वर्षी सफेद कांदा आला आहे मात्र काही शेतकऱ्यांचे सर्वच कांदे सफेद निघाले आहे. एकूण लावला रांगडा पुना फुरसुंगी कांदा आणि निघाले सफेद लसना सारखा कांदा त्यामुळे एकूणच कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

विलास गंगाराम एरंडे म्हाणाले, ''अवकाळी पावसाने कांदा रोपे वाया गेली. कांदा बी तीन हजारापासून सहा हजारापर्यंत किलोला  भाव झाला, तरी बी मिळेना. ओळखीने औरंगाबाद येथून दहा किलो बी आणले पण फसवणूक झाली कांदे सर्व सफेद निघाले. आता या पांढऱ्या कांदाल्या साठवणूक ही करता येईल की व्यापारी ही विचाराना  आपल्या कांद्या पेक्षा कमी भाव मिळत आहे.यावर्षी कांदा पिक करून अडचणीत आलो आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com