'त्या' बहाद्दरांनी शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली ते एकदा पाहाच...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

ओतूर उपबजारात कांदा, बटाटा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक: दोन व्यापाऱ्यांचे खरेदी व विक्रीचे परवाने रद्द
 

नारायणगाव : कांदा, बटाटा व भाजीपाला  उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेत मालाचे पैसे न दिल्यामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने ओतूर उपबजारातील दोन कांदा, बटाटा व भाजीपाला व्यापारी व आडतदार यांचे खरेदी विक्रीचे परवाने रद्द केले आहेत. परवाना रद्द केलेल्या पैकी एक व्यापारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी संचालक आहे. अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.

पुणेकरांनो, घराबाहेर पडताय? रेनकोट, छत्री सोबत असु द्या, कारण...

सभापती काळे म्हणाले शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या टोमॅटोचे पैसे न दिल्याने मे महिन्यात नारायणगाव टोमॅटो उपबजारतील टोमॅटो व्यापारी महेश मधुकर शिंगोटे(शिवनेर टोमॅटो सप्लायर्स),संदीप सखाराम काफरे( साईप्रसाद टोमॅटो सप्लायर्स),सुजित सुभाष चव्हाण, मदतनीस सूरज दीपक अडसरे( मुक्ताई ट्रेडिंग कंपनी), या तीन व्यापाऱ्यांचे खरेदी व विक्रीचे परवाने बाजार समितीने रद्द केले होते. त्या नंतर ओतूर उपबजारतील कांदा, बटाटा व्यापारी नासिर इब्राहिम मनियार व मे.गणेश ट्रेडिंग कंपनीचे राजेंद्र नारायण डुंबरे या दोन जणांचे परवाने बाजार समितीने रद्द केले आहेत.

या पैकी नासिर मनियार  हे बाजार समितीचे माजी संचालक आहेत. या व्यापाऱ्यांच्या विरोधात जुन्नर न्यायालयात दावा दाखल केला आहे. मागील महिनाभरात परवाना रद्द केलेल्या व्यापाऱ्यांची संख्या एकूण पाच झाली आहे.

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

दरम्यान, या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची विक्री करु नये. ओतूर उपबजारातील नासिर मनियार व राजेंद्र डुंबरे या दोन कांदा, बटाटा व भाजीपाला  व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांची रक्कम थकीत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांच्या आत बाजार समितीत शेतमाल विक्री केल्याच्या पावत्यासह बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी. असे आवाहन करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of farmers by two traders in narayangaon