डेटिंग साईटवर तरुणीला शोधणं पडलं महागात...

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर पुढील सर्व्हिस

मुंबई : डेटिंग साईटवर आपण अनेकदा सर्फिंग केले असेल. मात्र, अशाच प्रकारचे सर्फिंग करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. संबंधित व्यक्ती तरुणीला शोधण्यासाठी डेटिंग साईटचा वापर करत होता. मात्र, या माध्यमातून त्याची तब्बल 65 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

जयंत विश्वनाथ ढाळे असे फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तीचे नाव आहे. ते एका नामांकित कंपनीत नोकरीस आहेत. डेटिंग साईटवर तरुणी शोधताना पहिल्या वेळी 42 लाख तर दुसऱ्या वेळेस 23 लाख रुपये अशी दोन वेळा फसवणूक करण्यात आली. अशी एकूण 65 लाखांची फसवणूक झाली. दरम्यान, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर पुढील सर्व्हिस

डेटिंग साईटवर जयंत ढाळे तरुणीचा शोध घेत होते. त्यादरम्यान त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. जयंत यांनी संबंधित क्रमांकावर फोन केला. त्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर पुढील सर्व्हिस मिळेल, असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of rs 65 lakhs with the help of Dating Site