'ही तर मतदारांची फसवणूक'; तरुणांसह सामान्य मतदारांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

सकाळपासून सर्वच ठिकाणी आणि सर्वच स्थरावर आजच्या सत्तास्थापनेबद्दल चर्चा होत आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे मिम्स सध्या फिरत आहे. नव्या सरकारने कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करावे अशी अपेक्षा सुद्धा लोक व्यक्त करत आहे. 

पुणे : ''राज्यातील सत्तास्थापनेची प्रक्रिया बघून पुढच्या वेळी मतदान नक्की कुणाला करायचे हा प्रश्न पडला आहे. खिशातले पैसे घालून गावाकडं मतदानासाठी गेलो. ते याच साठी का? सत्तेची ही समीकरणे बघून मातदारांचीच फसवणूक झाली आहे, असा सूर तरुण मतदारांमध्ये उमटलेला दिसतो.

ज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा 

''एक वेळेला बिना लग्नाचे राहू पण, राष्ट्रवादी सोबत जाणार नाही'',असे मोठ्या तावातावाने सांगणारे फडणवीस रात्रीतून त्यांचाच उपमुख्यमंत्री करतात. आता त्यांना जुने आश्वासन आठवते का नाही,'' अशी प्रतिक्रिया गणेश सोनवणे यांनी दिली.

आणखी वाचा : पवार कुटुंबात कोण काय करतंय?

''लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होईल, मातदानाबद्दल संभ्रम निर्माण होईल अशी स्थिती राज्यात असल्याचे'',निलेश आंबरे यांनी सांगितले. तर रिक्षावाले काका म्हणाले, "काँग्रेस राष्ट्रवादीचे एकमत होत नाही हे बघून सेनेने सरळ भाजप बरोबर सरकार स्थापन करायला हवे होते. अजित पवार तडकाफडकी निर्णय घेणारे आहेत, तसेच फडणवीस यांच्या कामाचा आवाका बरा आहे. त्यामुळे या सरकारने चांगली कामे करावी अशी आमची अपेक्षा आहे."

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

सकाळपासून सर्वच ठिकाणी आणि सर्वच स्थरावर आजच्या सत्तास्थापनेबद्दल चर्चा होत आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे मिम्स सध्या फिरत आहे. ''नव्या सरकारने कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करावे अशी अपेक्षा उदय चंदेल
यांनी व्यक्त केली आहे. 
अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is fraud, said voters about Formation Of Government