फेसबुकद्वारे मैत्री करून महिलेची आर्थिक फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

पुणे : फेसबुकवर नव्याने मित्र झालेल्या व्यक्तींनी परदेशातून गिफ्टचे पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने एका महिलेची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चौघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला या येरवडा येथील रहिवासी आहेत. फिर्यादी महिलेशी फेसबुकवरील मित्रांनी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्‍वास संपादन केल्यानंतर त्यांच्याशी मोबाईल, ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यांच्या नावे परदेशातून महागड्या गिफ्टचे पार्सल पाठविण्यात आल्याचे सांगून ते घेण्यासाठी 27 हजार रुपये आणि त्यामध्ये सोने व पाउंड सापडल्याने दंडाची रक्कम म्हणून 2 लाख 75 हजार असे एकूण तीन लाख दोन हजार रुपये ऑनलाइनद्वारे भरण्यास सांगितले.

फिर्यादी महिलेने ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम पाठवली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, फोन बंद करण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Fraud through facebook in Pune