पुणे : 'ड्राय डे'ला दारु पिण्याची तल्लप पडली महागात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

 ऑनलाईन घुले वाईन शॉपला कॉल त्याने केला. फोन उचलणाऱ्याने आज ड्राय डे असल्याने दारु मिळाणार नाही पण, ऑनलाईन ऑर्डर केली तर घरपोच मिळेल असे सांगून पियालीला विश्वासात घेतले. पियाली याने बिय़प आर्डर केली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांने विचार न करताच फोनवरील व्यक्तीला सांगितला. त्यांच्या बँक अकांऊटमधून दोन वेळा पैस काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

पुणे : अयोध्या निकालप्रकरणी शनिवारी पुण्यात ड्राय डे जाहीर केला होता. पण, ड्राय डे दिवशी दारुची पिण्याची तल्लप तब्बल 50 हजार 778 रुपयांना पडली आहे. ऑनलाईन दारु मागविण्याऱ्या तरुणाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

पियाली दुलाल कर(वय 32, पेबल्स सोसोयटी, बावधान) असे तरुणाचे नाव आहे. अयोध्या निकालप्रकरणी शनिवारी ड्राय डे होता. तसेच शहरात पोलिसांचा बंदोबस्तही होता. त्यामुळे पियाली याने घरीच बसून दारु पिण्याचा बेत आखला. ऑनलाईन दारु आर्डर करण्याचे ठरविले. 

ऑनलाईन घुले वाईन शॉपला कॉल त्याने केला. फोन उचलणाऱ्याने आज ड्राय डे असल्याने दारु मिळाणार नाही पण, ऑनलाईन ऑर्डर केली तर घरपोच मिळेल असे सांगून पियालीला विश्वासात घेतले. पियाली याने बिय़प आर्डर केली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांने विचार न करताच फोनवरील व्यक्तीला सांगितला. त्यांच्या बँक अकांऊटमधून दोन वेळा पैस काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud While Buying Liquor online in pune

टॅग्स