पुणे : जादा परताव्याच्या बहाण्याने दाम्पत्याची तब्बल चार कोटींची फसवणूक

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : गुंतवणुकीमध्ये जादा परतावा देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या पदाधिकाऱ्य़ा विरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : गुंतवणुकीमध्ये जादा परतावा देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या पदाधिकाऱ्य़ा विरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​

याप्रकरणी कल्याणीनगर येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या पतीला ओळखीच्या व्यक्तीनी एका कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास जादा परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांच्याकडुन वेळोवेळी 4 कोटीची रक्कम घेतली. त्यानंतर परतावा आणि मूळ रक्कम ही देण्यास संबंधित कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.

आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: frauds to the couple for excess returns on Four crore investment