विद्यार्थ्यांनो, संस्कृत शिकायचे आहे का? मग वाचा महत्त्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

पुण्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा वर्ग खुला करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ९८२२८७०१२० दूरध्वनी क्रमांकांवर आपले नाव,पत्ता,शाळेचे नाव,इयत्ता व व्हाट्सअँप क्रमांक पाठवावेत.

पुणे -  जर्मन, फ्रेंच, इंग्रजी इत्यादी विषयांचे क्लासेस सहज उपलब्ध होतात. मात्र, सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृतचे क्लासेस मोठया प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणार्थ आॅनलाईन मोफत संस्कृत भाषा अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.  शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश असणार आहे, अशी माहिती ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे संस्थापक व प्राचार्य डॉ़ राजेंद्र खेडेकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुर्वेदाचार्य व संस्कृत पारंगत डॉ.सायली देशमुख-शारंगधर या संस्कृत भाषेचे अभ्यासवर्ग घेणार आहेत. केंद्रीय मंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्रस्टने हा उपक्रम राबविला आहे. पुण्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा वर्ग खुला करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ९८२२८७०१२० दूरध्वनी क्रमांकांवर आपले नाव, पत्ता, शाळेचे नाव, इयत्ता व व्हाट्सअँप क्रमांक पाठवावेत. प्रवेश मर्यादित असून संपूर्ण शिक्षण हे आॅनलाइन असणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ.राजेंद्र खेडेकर म्हणाले, नाव नोंदविणा-या विद्यार्थ्यांना त्या त्या वेळी अभ्यास वर्गाच्य्या लिंक पाठवण्यात येतील. वर्ग सुरू होण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनिटे प्रत्येक विद्यार्थ्याने लॉगिन व्हायचे आहे. प्रत्येक वर्गाच्या वेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे. सलग दोन वर्ग अनुपस्थित असणा-या विद्यार्थ्यांचे नाव कमी करून नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्यामुळे याविषयी वर्गाकडे अत्यंत गांभीर्याने पहावे आणि वर्गात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुणेकरांनो, शक्यतो घरातच राहा! बाहेर जाणार असला तर, महत्त्वाची बातमी वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free admission to Sanskrit language classes in schools and colleges