जुन्नरला युवा सेनेच्या वतीने मोफत कापडी पिशवीचे वाटप

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 29 जून 2018

जुन्नर : राज्य सरकारच्या प्लॅस्टिक प्लस्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करीत जुन्नर युवा सेनेचे तेजस बोठे यांनी आज शहरातील कल्याण पेठ, नेहरू बाजार परिसरात तसेच अण्णासाहेब आवटे विद्यालयात मोफत पाचशे कापडी पिशव्याचे वाटप केले.  

नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक समीर भगत, युवा सेनेचे कार्यकर्ते विपुल ताथेड, करण गायकवाड, अभिषेक शिंदे, ओंकार डामसे, सनी खराडे, प्रथम पवार, सिद्धांत भागवत, ओंकार गाडेकर, अक्षय सावंत, अथर्व जुंदरे, अक्षय डामसे, ओंकार पवार तसेच अरुण मंचरकर ,अकील शेख आदी यावेळी उपस्थित होते.तेजस बोठे व युवा मित्रांनी राबविलेल्या मोफत पिशवी वाटप उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. हा उपक्रम तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा आहे असे मत नगराध्यक्ष शाम पांडे यांनी यावेळी व्यक्त केले. आरोग्य सभापती अंकिता गोसावी यांनी देखील घरोघरी जाऊन प्लॅस्टिक चा वापर टाळा व कापडी पिशव्याचा वापर करा असा संदेश देऊन जनजागृती केली.

Web Title: free cloth bag distribution from yuva sena